- प्रॅक्टीकल मराठा काय आहे?
"प्रॅक्टिकल मराठा" या नावातच एक आशय दडलेला आहे. ही प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या कृतिशील मराठ्यांच्या प्रयत्नातून साकार होत असलेली चळवळक्षम कंपनी असणार आहे. कंपनीचे ध्येय "अमूल उद्योग समूहाच्या" धर्तीवर व्यापक काम उभे करणे व जास्तीत जास्त मराठा समाजातील तरुणांना रोजगार/व्यवसाय उपलब्ध करून देणे हे आहे.
तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठा समाजाचे एकत्रीकरण व समाजाच्या सांस्कृतिक समृद्धीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. अशा रितीने सर्व स्तरातील मराठ्यांच्या हाताला काम आणि प्रतिभेला वाव देणारे हक्काचे व्यासपिठ म्हणजे प्रॅक्टिकल मराठा!
- "प्रॅक्टिकल मराठा" मधे कोण सामील होऊ शकते?
प्रॅक्टिकल मराठा ही मराठ्यांनी मराठ्यांच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक उत्थानासाठी उभा केलेली व्यावसायिक संकल्पना आहे. आपण व्यवसाय जगभरात कोणाबरोबरही करू पण आपल्या संकल्पनेचा "मुख्य लाभार्थी" हा मराठा समाजच असला पाहिजे म्हणून फक्त जातीने आणि जन्माने मराठा असलेले लोकच आपल्या प्लॅटफॉर्मवर सहभाग घेऊ शकतात इतर कोणीही नाही.
या ठिकाणी टीका टिपणी राजकीय हेतू आणि अभिनिवेश एंटरटेनमेंट किंवा थिल्लरपणा बिलकुल खपवून घेतला जाणार नाही. हे गांभीर्यपूर्वक केले जाणारे काम आहे.
- प्रॅक्टीकल मराठा ही कल्पना कशी सुचली?
कोरोना काळामध्ये बाहेर पडणे शक्य नव्हते म्हणून इंटरनेटवर कोरा मराठी या प्लॅटफॉर्मवर लिहायला सुरूवात केली. त्यातील एका प्रश्नाने त्या तरुणाचे लक्ष वेधून घेतले : मराठी माणूस सण उत्सव आणि राजकारणा व्यतिरिक्त एकत्र येऊन उद्योग करू शकतो का? या प्रश्नाला माझ्यासारख्याच अनेक मराठी धडपड्या व्यक्तींचा प्रतिसाद लाभला आणि सुरू झाला स्वप्नांचा पाठलाग!
कोरा मराठी सारख्या प्लॅटफॉर्म वरून अनोळखी मराठी लोकांनी एकत्र येऊन शेअर्स द्वारे गुंतवणूक करून आषाढी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या सामुदायिक उद्योगाची स्थापना केली. ही देशातील पहिलीच अशा प्रकारची सामुदाईक उद्योग कंपनी. 50 लाख भाग भांडवल सुमारे दीडशे च्या वर शेअर होल्डर सत्तरच्या पुढे डिस्ट्रीब्यूटर सह हा उद्योग वेगाने वाटचाल करत आहे. मराठी लोकांनी एकत्र येऊन केलेला हा चमत्कार होता.
आषाढीच्या संकल्पनेपासून गेल्या दोन वर्षात आलेल्या अनुभवातून आता खात्री वाटते की प्रॅक्टीकल मराठा हा फार आश्वासक पर्याय असणार आहे
- ह्या संकल्पनेमागे कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा हात आहे?
नाही ही संकल्पना आषाढी व्हेंचर सारख्या मराठी लोकांच्या चळवळक्षण कंपनीच्या वाटचालीत प्रत्यक्ष घेतलेल्या अनुभवातून सुचलेली संकल्पना आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याकडून अपेक्षापूर्ती होत नसल्याने तसेच अपेक्षित बदल होत नसल्याने अस्वस्थ मराठा समाजाचा भाग असलेल्या प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन चालू केलेला उपक्रम आहे.
ही चळवळक्षम कंपनी आहे पण सामाजीक संस्था नाही आणि कुठल्याही राजकीय पुढारी वा पक्षांसोबत काम करणार नाही. जोवर पूर्णपणे आर्थिक सक्षमता येत नाही तोवर कुठल्याही सामाजिक लढ्यांवर काम करणार नाही. ही चळवळ पूर्णपणे उद्योग केंद्रित असेल. पण शेअरमार्केट, नेटवर्क मार्केटींग सारखी पटकन श्रीमंत व्हायची स्किम नाही आणि अशा कुठल्याही स्किममधे गुंतवणूक करणार नाही.
- इतर जे मराठा ग्रुप आहेत त्यापेक्षा वेगळे काय करणार?
आपण सामाजिक संघटना किंवा एनजीओ नाही. त्यामुळे आपले अवलंबीत्व डोनेशन वर व राजकीय दयेवर अवलंबून नाही. आपण आपली कंपनी आणि सहकारी जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही सामाजिक प्रश्नांवर काम करणार नाही. कंपनीला जास्तीत जास्त मोठे करणे आणि त्या माध्यमातून सामाजीक प्रभाव निर्माण करून मग वेगवेगळ्या प्रश्नांना हात घातला जाईल.
- कंपनीच का? संस्था का नाही?
आपण सामाजिक संघटना किंवा एनजीओ नाही. त्यामुळे आपले अवलंबीत्व डोनेशन वर व राजकीय दयेवर अवलंबून नाही.
आपण एक प्रॉफिट मेकिंग कंपनी असणार आहोत व हा मुख्य फरक इतर संघटना मध्ये आणि आपल्या मध्ये असणार आहे. आपण आपली कंपनी आणि सहकारी जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही सामाजिक प्रश्नांवर काम करणार नाही. कंपनीला जास्तीत जास्त मोठे करणे आणि त्या माध्यमातून प्रभाव निर्माण करून वेगवेगळ्या प्रश्नांना हात घातला जाईल.
केंद्र सरकारच्या कंपनी कायद्याच्या अधीन राहून काम करत असल्याने आपल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद असेल. प्रॉफिट मेकिंग कंपनी असल्यामुळे कुणाच्याही डोनेशन वर अवलंबून राहावे लागणार नाही परिणामी आपले काम अधिक स्वतंत्रपणे आणि परिणामकारक करता येणार आहे.
- प्रॅक्टीकल मराठा पोर्टलवर रजिस्टर का करायचे?
रजिस्ट्रेशननंतर तुमचे व्हेरीफिकेशन पूर्ण झाले की तुम्ही कला, क्रीडा, इतिहास आणि तुमच्या आवडीच्या विवीध विषयांवर व लिखाण करू शकता. तुमचे विचार, कार्य जगभरातील मराठी लोकांच्या दृष्टीक्षेपात येईल. तुमच्या माहितीमधे आपल्या मराठा समाजातील लोकांना नोकरी किंवा सेवा क्षेत्रात संधी असतील तर त्यादेखील तुम्ही जॉबबोर्डावर मांडू शकता. आपल्यातील जे मराठा सहकारी व्यावसायिक किंवा उद्योजक आहेत ते आपली उत्पादने किंवा सर्विसेस ह्याबद्दल माहिती देऊ शकतात जी डिरेक्टरीमधे उपलब्ध होईल. मराठा समाजातील विवाहेच्छुक वर-वधू प्रोफाइल रजिस्टर करू शकतात. आणि हे सारे कायमच विनामूल्य आहे!
- प्रॅक्टीकल मराठाची उत्पादने कुठली असणार?
आपली सुरवातीचे उत्पादन हे कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी हे असणार आहे. हे उत्पादन म्हणण्यापेक्षा एक टूल असणार आहे अधिकाधिक मराठ्यांना जोडण्याचे आणि विक्री कौशल्य रुजवण्याचे. त्यानंतर आपण भरड धान्य या उत्पादनावर काम करणार आहोत. वरील दोन्ही उत्पादने इथल्या मातीत रुजलेली आपण उत्पादित केलेली आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची आरोग्यासाठी महत्त्वाची असलेली पण मार्केटिंगच्या जमान्यात मागे पडलेली उत्पादने आहेत. आपल्या आरोग्यासाठी आणि इकॉनोमी साठी यांचे पुनरुज्जीवन करत आहोत.
- प्रॉडक्ट विकून नक्की काय होणार?
मराठा समाज सर्व दूर पसरलेला मोठा समुदाय आहे. समाजाने ठरवले तर करोडो रुपयांचा फंड उभा करणे अवघड नाही त्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. पण कुठल्याही कंपनीचा प्रॉडक्ट किंवा सर्विस चा मुख्य भाग हा सेल्स असतो. प्रॉडक्ट विकण्यापेक्षा प्रॉडक्ट बनवणे तुलनेने सोपे आहे. आपण बरेच काही बनवू शकतो पण ब्रॅण्डिंग करून प्रॉडक्ट विकण्याची कला आपल्याला जमली पाहिजे त्यामुळे आपण सुरुवातीला कडक भाकरी पॅकेट विकण्याचे काम करणार आहोत. कुणालाही भेटू तेव्हा केवळ गप्पा आणि चर्चा करण्यापेक्षा भाकरीचे एक पाकीट विकून त्या माध्यमातून व्यवहार झाला पाहिजे. आपला विचार व वाटचाली संदर्भात एक लिटरेचर आपल्या बांधवापर्यंत पोहोचले पाहिजे. लक्षात घ्या आपल्या भाकरीला प्रॉडक्ट म्हणून न पाहता एक टूल म्हणून आपण याचा उपयोग करणार आहोत. यातून किती पैसे मिळणार हा मुद्दा गौण आहे. या माध्यमातून "विक्री होणे" हा विचार पोहोचणे व "मराठा बांधव जोडला जाणे" हा मुख्य उद्देश आहे.
आपण नुसत्याच भेटीगाठी आणि गप्पा यासाठी एकत्र येण्यापेक्षा त्यातून प्रत्यक्ष विक्री/व्यवहार झाला पाहिजे. आणि एकदा विक्रीची खात्री झाली की आपण दैनंदिन जीवनातील किती तरी वस्तू आणि सेवा देऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात चळवळीचा भाग म्हणून आपण कडक भाकरी चे ब्रॅण्डिंग आणि विक्री सुरू करत आहोत.
- आम्ही आमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस "प्रॅक्टीकल मराठा" पोर्टलवर जाहिरात करू शकतो का?
हो. सकल मराठा समाजाचे टॅलेंट, व्यवसाय आणि प्रतिभा व्यक्त करायला मध्यवर्ती पोर्टल असावे ह्या संकल्पनेतूनच प्रॅक्टीकल मराठाचा जन्म आहे. त्यामुळे तुम्ही हक्काने तुमच्या प्रोफेशन, कला किंवा व्यवसायाची माहिती देऊ शकता जी डिरेक्टरी सर्विसमधे उपलब्ध होईल व गुगल सारख्या सर्च इंजीनबरोबर शेअर केली जाईल. तुमच्या व्यवसायाच्या इंटरनेटवरील नोंदीमुळे तुमची माहिती देश-विदेशातील अनेक लोकांना उपलब्ध होणार आहे व ह्याचा कायमस्वरूपी फायदा तुम्हाला मिळणार आहे. आणि हे कायमच विनामूल्य आहे!
पण तुमचे प्रॉडक्ट हे कंपनीचे प्रॉडक्ट नसणार आहे तसेच संबंधित व्यवहाराला प्रॅक्टिकल मराठा जबाबदार असणार नाही!
- कंपनी स्ट्रक्चर कसे आहे?
एक हजार रुपयांना एक शेअर व प्रतिव्यक्ती जास्तीत जास्त दहा प्रेफरन्स शेअर्स अशा प्रकारचे स्ट्रक्चर असणार आहे. जास्तीत जास्त लोक शेअर्स च्या माध्यमातून कंपनीमध्ये जोडले जावेत तसेच भांडवलशाही व पॉवर गेम होऊ नये म्हणून अशी रचना आहे. या शेअर्स च्या माध्यमातून तुम्ही या कंपनीचे अधिकृत शेअर होल्डर आणि मालक असणार आहात. कंपनीला अमूलच्या धरतीवर जास्तीत जास्त मोठे करणे आपले ध्येय असणार आहे. कंपनी जशी जशी मोठी होत जाईल तशी तशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सेवा-उद्योग क्षेत्रातील कामे हाती घेतली जातील.
- कंपनीमधे गुंतवलेले पैसे कशा प्रकारे वाढतील? नविन मराठा जोडण्याचे कमीशन किती आहे?
"प्रॅक्टीकल मराठा" ही नेटवर्क मार्केटींग, मल्टीलेव्हल मार्केटींग स्वरूपाची किंवा कुठलिही स्किम नाही. "Get Rich Quick" स्वरूपाच्या कुठल्याही प्रिंसीपल/योजना "प्रॅक्टीकल मराठा" आणि "प्रॅक्टीकल मराठाचे सभासद" कुठल्याच स्वरूपात मांडत नाही, समर्थन करत नाही. इथे केवळ तुम्ही मेंबर आहात म्हणून तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्ही १०० लोक जोडून १० लाखाचे शेअर कॅपीटल जरी आणले तरी तुम्हाला केवळ "धन्यवाद" मिळतील. ह्यावर कुठल्याही स्वरूपाचे कमीशन कधीच मिळत नाही.
प्रत्यक्ष प्रोजेक्टमधे सामील होऊन जेव्हा तुम्ही "काम" करता तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला उत्पन्न चालू होते आणि ते तुमची मेहनत, प्रोजेक्टचे स्वरूप आणि त्याचे यश ह्यावर अवलंबून असते.