Skip to main content

योजना (Plan of Action)

 

"सोशल स्टार्टअप" ही मूळ "आषाढी व्हेंचर्सच्या" प्रवर्तकांनी जन्माला घातलेली एक अभिनव संकल्पना आहे. तशाच प्रकारच्या संरचनेवर "प्रॅक्टीकल मराठा" कार्यरत आहे. इथे आम्ही सोशल कॅपिटल, सोशल एक्सपरीमेंट, सोशल इनोव्हेशन आणि सोशल रिटर्न्स ह्या विषयांवर काम करतो. सोशल एंटरप्रेनरशीप म्हणजे नक्की काय हे तुम्ही विकीपिडीया वर वाचूच शकता. थोडक्यात समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपला वेळ आणि रिसोर्सेस शेअर करून काहीतरी अधिकाधिका लोकांपर्यंत पोहोचेल असे समावेशक करून दाखवायचे असा हा कंसेप्ट असतो... अर्थात हे सामाजिक कार्य अजिबात नाही. आषाढीमधे आम्ही केवळ प्रॉफीट मेकींग प्रोजेक्ट्सवरच काम करतो. आणि हे करत असताना केवळ पैसे मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता सत्शक्तींचा प्रभाव निर्माण करणे हे खरे महत्वाचे साध्य असते!

महत्वाचे टप्पे -

  1. "प्रॅक्टीकल मराठा" ही भारत सरकारच्या कंपनी नियमांतर्गत रजिस्टर होणारी प्रायवेट लिमीटेड कंपनी असणार आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे. ह्या सोबतच ती स्टार्टअप इंडियाला देखील रजिस्टर होईल व इतर आवश्यक लायसंस मिळवेल.
  2. लोकांसमोर कंसेप्ट मांडणे व जनाधार तपासणे - सोशल एंटरप्रेनरशीप = सोशल एक्सपरीमेंट, सोशल इनोव्हेशन, सोशल कॅपिटल आणि सोशल रिटर्न्स.
  3. कंपनीमधे उत्पन्नाच्या दृष्टीने बहुसमावेशक असा एक प्रोजेक्ट चालू करणे : कडक भाकरी - चटणी
  4. पहिल्या बॅचच्या सभासदांना कंपनीमधे प्रवेश व कंपनीचे किमान ३ लाख रुपयाचे शेअर होल्डींग उभे करणे. ह्या दरम्यानचे सारे स्टॅच्युटरी डॉक्यूमेंट मॅनेज करून कंपनी कायदेशीर मार्गाने मार्गस्थ करणे
  5. पहिल्या बॅचचे शेअर होल्डींग प्रोसिजर पूर्ण होता होता आपण स्वतंत्र ब्रँड रजिस्टर करणार आहोत. सभासदांना फ्रॅचाइजी, मार्केटींग व व्हेंडरशीप अशा विवीध प्रकारे सहभाग घेता येणार आहे.
  6. कंपनीचे पोर्टल पूर्ण ताकदीने चालू करणे
  7. कंपनीचे +७ लाख रुपयाचे शेअर होल्डींग उभे करणे. अधिक काही प्रॉडक्टवर काम चालू होईल
  8. १९ लाख रूपयाचे शेअरहोल्डींग उभे राहीले की आपण कंपनी पब्लिक लिमिटेड करायला घेणार आहोत.
  9. कंपनीचे २५ लाख रूपयाचे भांडवल आणि किमान १० जीवनोपयोगी प्रॉडक्ट आणि अधिकाधिक फ्रांचाइजी - एक वर्षाचा प्लॅन
  10. पब्लिक लिमीटेड कंपनीचे १ कोटी रूपयाचे भांडवल आणि किमान १०० प्रॉडक्ट आणि अधिकाधिक फ्रांचाइजी - तीन वर्षाचा प्लॅन