Skip to main content

बुधभूषण

Submitted by practical maratha on

बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडा मध्ये लिहीलेला ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.

बुधभूषण हा स्वतंत्र ग्रंथ नाही. यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी मनुस्मृती, महाभारत, कामन्दकीय नीतिसार, विष्णूधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. विविध पुराण ग्रंथांतून संभाजी महाराजांनी ’राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण करून व विषयानुरूप शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.

बुधभूषणमध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयावर एक-एक तर सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत. सुमारे एकोणनव्वद विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन अन्योक्ती रूपाने व्यंगाचा मोठा खुबीदार वापर या ग्रंथातल्या श्लोकांत झाला आहे.