महाराणी ताराबाई (१६७५ - १७६१) या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८७ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या.
इतिहास
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, १९०० - डिसेंबर ६, १९७६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते.
बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडा मध्ये लिहीलेला ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.
१७ ते १८वे शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी व संरक्षणासाठी ज्या मराठा घराण्यांनी योगदान दिले, त्या राजघराण्यांची ही यादी आहे. मराठा ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि शेजारील राज्यांतील क्षत्रिय जात आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, होयसाळ, चौहान, गुहिल, सिसोदिया, सोळंकी, परमार, अभिर अशा उत्तर आणि दक्षिण भारतातील प्राचीन क्षत्रिय घराण्यांशी मराठ्यांची मुळे आहेत.
मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे. मराठा जातीचे क्षत्रिय ९६ कुळ व पाटील-देशमुख-राव पदवी आहेत.
महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. मराठा हा शब्द महारठीक शब्दापासुन तयार झाला आहे.रठीक हे महाराष्ट्रातील पराक्रमी लोक होते .रठीकांना राष्ट्रीक असेही म्हणत होते. त्यावरून महाराष्ट्रीक असा उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्रीकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे ओळखण्यात आले.