मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे. मराठा जातीचे क्षत्रिय ९६ कुळ व पाटील-देशमुख-राव पदवी आहेत.
महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. मराठा हा शब्द महारठीक शब्दापासुन तयार झाला आहे.रठीक हे महाराष्ट्रातील पराक्रमी लोक होते .रठीकांना राष्ट्रीक असेही म्हणत होते. त्यावरून महाराष्ट्रीक असा उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्रीकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे ओळखण्यात आले.
महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले. जसे सातवाहन, वाकाटक, चालुक्य (साळुंखे), राष्ट्रकूट (बागुल), शिलाहार, कदम्ब (कदंब), निकुंभ, मौर्य (मोरे), सेंन्द्रक (शिंदे), देवगिरिचे यादव (जाधव), शिशोदे (भौसले) तर या सर्व राजवंशांचे वंशज आत्ताचे क्षत्रिय 96 कुळी मराठा आहेत. भारतावरील अनेक परकीय आक्रमणे परतवुन लावतांना मराठा लोकांनी प्राणांची आहुती सदैव दिली आहे.या नांवाने मराठा रेजमेंट भारतीय सैन्यामध्ये आहे.
मराठा साम्राज्य हे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले. आदीलशाही, मोगलशाहींशी लढून त्यांनी हे राज्य वाढविले. हेच कार्य पुढे छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी केले. मोगल बादशाह औरंगजेबाशी लढतांना त्यांनी प्राणांचे बलीदान दिले. त्यानंतर शिवरायांचे द्वीतीय पुत्र छत्रपती राजाराम, महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला. औरंगजेबास महाराष्ट्रातच मृत्यू आला. तो दिल्लीस परत जावु शकला नाही.