Skip to main content

मराठा घराणी

Submitted by practical maratha on

१७ ते १८वे शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी व संरक्षणासाठी ज्या मराठा घराण्यांनी योगदान दिले, त्या राजघराण्यांची ही यादी आहे. मराठा ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि शेजारील राज्यांतील क्षत्रिय जात आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, होयसाळ, चौहान, गुहिल, सिसोदिया, सोळंकी, परमार, अभिर अशा उत्तर आणि दक्षिण भारतातील प्राचीन क्षत्रिय घराण्यांशी मराठ्यांची मुळे आहेत.

  • भोसले घराणे : भोसले घराणे हे घराणे मराठा साम्राज्यातील मुख्य व महत्त्वाचे घराणे मानले जाते. शिवाजी महाराज हे याच घराण्यातील होते. या घराण्याचा मराठा साम्राज्याच्या स्थापनेपासून ते विस्तारापर्यंत मोलाचा वाटा आहे. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी कोल्हापूरकर भोसले, सातारकर भोसले, नागपूरकर भोसले, अक्कलकोटकर भोसले, तंजावरकर भोसले या प्रमुख शाखा.
  • घोरपडे घराणे : घोरपडे घराणे हे घराणे भोसले घराण्याची थोरली शाखा असून भोसल्यांचे भाऊबंद आहेत. बहमनी काळात घोरपडीच्या मदतीने कोकणातील किल्ला जिंकल्याने घोरपडे हे आडनाव प्राप्त झाले. हे घराणे आदिलशाहीत प्रमुख सरदारांपैकी एक होते. या घराण्यातील बाजी घोरपडे याने शहाजी राजांशी दगाफटका केल्याने, याला शिवरायांनी ठार मारले. मराठा साम्राज्याचे सेनापती संताजी घोरपडे हे याच घराण्यातील होते. या घराण्याला ममलकतमदार, हिंदुराव व अमिर-उल-उमराव हे किताब होते. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी कापशीकर घोरपडे, मुधोळकर घोरपडे, सेंदूरकर घोरपडे, दत्तवाडचे घोरपडे आणि गजेन्द्रगडकर घोरपडे या प्रमुख शाखा
  • तळबीडकर मोहिते घराणे : तळबीडकर मोहिते घराणे हे घराणे शिवकाळात स्वराज्यात सामील झाले. सेनापती हंबीरराव मोहिते व शिवरायांच्या पत्नी सोयराबाई ह्या याच घराण्यातील. या घराण्याला हंबीरराव हा किताब शिवरायांनी दिला. या‌ घराण्याच्या अनेक शाखा महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी तळबीड ही मुख्य मानली जाते.
  • कदमबांडे घराणे : कदमबांडे घराणे हे एक मराठा घराणे आहे. १८व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात व खानदेश प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे.
  • शिंदे/सिंधिया घराणे : शिंदे/सिंधिया घराणे - वंश - सुर्यवंश, उपवंश - शेष, गोत्र - वशिष्ठ (शाखा - कौण्डिन्यः), प्रवर - वशिष्ठ-मैत्रावरुण-कौण्डिन्यः, वेद - यजुर्वेद, उपवेद - धनुर्वेद, देवक - मृगवेल, कुळदेवी - आदि शक्ती जनाई देवी, कुळदैवता - श्री ज्योतिबा, चिन्ह - सर्प (नाग), ध्वज - केशरी व लाल, उत्पत्ती - सिंधदेश, मुळगाव - कण्हेरखेड़ (महाराष्ट्र), राजक्षेत्र - उज्जैन; ग्वाल्हेर; दिल्ली आदि, पदवी - पाटील (हिन्दुस्ताना चा पाटील), देशमुख, सरकार, राजे, महाराज आदि. शिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिंधीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेड़ या गावचे पाटील होते. राणोजी शिन्दे हा मूळ कर्ता होता. या शिन्दे घराण्याचे कुलदैवत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्‍नागिरीचा दक्खनचा राजा श्री जोतिबा.या जोतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये शिन्दे सरकार यांच्या शासनकाठीला पहिल्या मानाच्या अठरा शासनकाठ्या मध्ये नऊ क्रमांकचा मान आहे.सध्या शिन्दे ग्वाल्हेर याठिकाणी स्थायिक असल्यामुळे त्याची ही मानाची शासनकाठी त्यांच्या वतीने चालवण्याचा मान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील करंजवडे गावाच्या ग्रामस्थांना शिन्देंनी फार पूर्वीपासून दिला आहे.तशी नोन्द सुद्धा सिन्धिया देवस्थान ट्रस्ट यांच्याकडे आहे.
  • धनुरकर शिंदे घराणे : धनुरकर शिंदे घराणे - वंश - सुर्यवंश, उपवंश - शेष, गोत्र - विशिष्ठ (शाखा - कौण्डिन्यः), प्रवर - वशिष्ठ-मैत्रावरुण-कौण्डिन्यः, वेद - यजुर्वेद, उपवेद - धनुर्वेद, देवक - वटवृक्ष, कुळदेवी - आदि शक्ति धनदाई देवी, कुळदेवता - श्री काळभैरवः, चिन्ह - सर्प (नाग), ध्वज - केशरी व भगवा, उत्पत्ती - सिंधदेश, मुळगाव - अमीरगढ़ (राजस्थान), राजक्षेत्र - धनुर ; नाशिक; डोंगरगाव; तोरणमाळ-अक्रानी आदि , पदवी - पाटील, देशमुख, रावसाहेब आदि. धनुरकर शिंदे हे ताप्तीय-मराठा घराणे खान्देशात "खान्देश सल्तनत" राजकारणत वतनदार होते. नन्तर मराठा हिंदवी साम्राज्यात पेशवा बालाजी च्या सैन्यात कार्य केले, तोरणमाळ-अक्रानी क्षेत्र चे वतनदार झाले व क्षेत्रीय-देशमुख व रावसाहेब हे पदवी मिळाली. ब्रिटिश राज कालातीत त्यांची क्षेत्रीय-देशमुखी व रावसाहेबकी रद्द करण्यात आली व कलेक्टर नावाची अफशरशाही लागू केली पण वतनदार घराणे म्हणुन गावांची पाटीलकी बरकरार ढेवली. त्यात गावांचे नाव धनुर, कापडणे, उमरखेड, शीरूड, जोवखेड़ा, बोरकुंड, डोंगरगाव, म्सहावद, मड़काणी, तोरणमाळ, फत्तेपुर, धडगाव, भोंगरा, डोंडवाडा, मोरतलाई, अमळनेर, धरणगांव, रावेर, अशीरगढ़, नेपागाव, बैतूल, मुलताई आदि आहेत. शिंदे-पाटील, शिंदे-देशमुख, शिंदे-सरकार हे आडनाव व ताप्तीय-मराठा हे समाज लिहून या शिंदेवंश चे १२०० घराणे खान्देशात (ताप्तीक्षेत्र) राहत आहेत.
  • धारचे पवार घराणे : धारचे पवार घराणे मूळचे सुपे येथील शिवकाळातील हे मराठा घराणे पेशवाईत उदयाला आले. १८व्या शतकात माळवा प्रांतात मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यास या घराण्याचा मोलाचा वाटा आहे. या घराण्याला विश्वासराव व सेनाबारासहस्री हे किताब होते. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी सुपेकर पवार, वाघोलीकर पवार, धारचे पवार आणि देवासचे पवार या प्रमुख शाखा.
  • थोरात घराणे : थोरात घराणे हे शिवकाळातील मराठा घराणे पेशवाईत उदयाला आले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चाललेल्या मुघल-मराठा संघर्षात या घराण्याने विलक्षण पराक्रम गाजवला. या घराण्याला दिनकरराव, अमिरुलउमराव व जंगबहादर हे किताब होते. १८व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात, खानदेश व बागलाण प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे. या घराण्याला सूरत, संगमनेर, जुन्नर, कडेवलीत, पुणे आणि विजापूर या प्रांतात सरंजाम होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घराण्यातील अनेक पुरुष कामी आले. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी विरगावकर थोरात, वाळकीकर थोरात, वाळवेकर थोरात, पारनेरकर थोरात, नेवासकर थोरात आणि भूमचे थोरात ,खुटबावचे थोरात (एक शाखा अनगरे ता. श्रीगोंदा येथे स्थायिक) या प्रमुख शाखा.
  • जगदाळे घराणे : जगदाळे हे घराणे मूळचे मसूर परगण्यातील पिढीजात वतनदार होते. हे घराणे पवार घराण्याची एक शाखा आहे. शिवकाळात हे घराणे आदिलशाहीच्या सेवेत होते. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी या घराण्यातील महादजी जगदाळे हा अफजल खानाला येऊन मिळाला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत हा ठार झाला, पुढे शाहू राजांच्या काळात हे घराणे मराठा साम्राज्यात सामील झाले.
  • ढमढेरे घराणे : ढमढेरे हे मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध घराणे आहे. तळेगाव ढमढेरे हे या घराण्याचे मूळ ठिकाण आहे. छत्रपती संभाजी महाराज ते पेशवाई कालखंडापर्यंत या घराण्याने उत्तम कामगिरी बजावली आहे. ढमढेरे हे पेशव्यांच्या हुजुरात सैन्यातील प्रमुख सरदारांपैकी एक होते.
  • देवळालीकर कदम घराणे : देवळालीकर कदम देवळाली प्रवरा येथील कदम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस राजगड किल्याचे तट-सरनौबत होते. राजाराम छत्रपतींच्या जिंजीच्या प्रवासातही बाजी कदम आणि खंडोजी कदम देवळालीकर हे बरोबर होते.
  • रणनवरे/रणवरे घराणे : रणनवरे/रणवरे हे शिवपूर्वकालीन प्रतिष्ठित मराठा घराणे आहे, रणामध्ये लढण्यासाठी अग्रेसर साळुंखे चालुक्यांची एक शाखा,मराठ्यांच्या प्राचीन ९६ कुळांमधील एक प्रतिष्ठित असे घराणे. तंजावर येथील प्रसिद्ध शिलालेखातील शहाजी राजांना मदत करणाऱ्या ९६ कुळांच्या यादीत या घराण्याचे नाव आहे. महाराष्ट्रात रणनवरे/रणवरे परिवाराच्या शाखा असलेली गावे... पुणे जिल्हा:निमसाखर, मळद (दौंड),राख, सणसर, रणनवरेवाडी, हिंजवडी. मांडकी, निंभोरे, जिंती (सातारा), शिंदेवाडी, बोथे, लोणी (सातारा), सिंदुरजन (कोल्हापुर), काटी (विदर्भ), सेलू (वर्धा), पाणीपत (हरियाणा), बदामी (कर्नाटक).
  • महाडीक घराणे : महाडीक - तारळे(सातारा जिल्हा), नागपूर, कोल्हापूर (महाराष्ट्र) कोकण, महाड, नेवरी,येलूर,ग्वाल्हेर, तंजावर, कर्नाटक.
  • माने घराणे : माने -गौर राजवंश वंशज, गौर यांनी माने 'ख़िताब मिळवला.[[ कुळ: सूर्यवंशी, देवक: गरुड पक्षी, गरुडाचे पंख. रहिमतपूर माने आणि म्हसवड राजेमाने सातारा जिल्हा)(सावर्डे तासगाव सांगली) (महाराष्ट्र) , वेळापूर् माने-देशमुख , कारेपूर, ता-लातुर, माने-भिमबहादुर कसबा सांगाव, मांगूर, चरेगाव, उदगाव. माने(भुजबळराव)आंबव,व भुजबळराव,घाटीवळे, माने, कुरचुम,सर्व गावे ता.संगमेश्वर (रत्‍नागिरी जिल्हा), सरकार-रुकडी, भादोले, भेंडवडे. यवतमाळ आणि नागपूर येथील माने. ठोमासे गांव चे माने पाटील
  • घाटगे | राजे-घाटगे घराणे : राजे-घाटगे || राजे-घाडगे (वंश: सूर्यवंश गोत्र:कश्यप देवकः-सूर्यफुल)[-राष्ट्रकुट - राठोड-घाटगे घाडगे वंश], बूध, राजापूर, डिस्कळ(दिसकळ), मलवडी, निमसोड ता.खटाव, रायगाव, कोळ, (कराड भाग), खटाव मान काही भागात केंजळगड (सातारा जिल्हा), कुमठे,बोरगांव(बहे)(जिल्हा सागली) कागल (कोल्हापूर जिल्हा) (महाराष्ट्र, कर्नाटक).
  • मोरे घराणे : मोरे -सुर्यवंश, लक्षमणपुत्र चंद्रकेतूचे वंशज, (मौर्यखंड), जावळी, रायगड किल्ल्याचा परिसर, खटाव (सातारा जिल्हा) या गावाजवळचा वर्धनगड (महाराष्ट्र).
  • मोहिते घराणे : मोहिते -अग्नीवंशी, हाडा चव्हानकुळी, तळबीड, गोवेे(सातारा) येेेथील 'मोहिते इनामदार' [पोखले-ता.पन्हाळा येथील-मोहिते पाटील]
  • मानकर घराणे : मानकर : सरदार खंडोजी दादजी मानकर (छत्रपती शाहू पर्व) यांचे सरदार घराणे. (सरखेल तुळाजी आंग्रे यांचे सासरे) मानकर वाडा- खरवली, ता.माणगांव,जि.रायगड, पुणे जिल्हा : सांगरुण, ता.हवेली (शूर दादजी मानकर-सरपाटील, कातवडी-मोसे खोरे) कासार आंबोली, ता.मुळशी, आंबवणे, ता.मुळशी, पारगाव पेठ, ता.जुन्नर प्रांत. (महाराष्ट्र) (ऐतिहासिक दुरुस्ती:गणेश संभाजी मानकर,पुणे यांनी केली असे.पुणे ०९ सप्टेंबर २०२३)
  • मारणे घराणे : मारणे - मुठे खोरे , मुठे मावळ, आंदगाव येथील 'मारणे देशमुख'
  • शिर्के घराणे : शिर्के - कोकण, श्रीरंगपूर, (महाराष्ट्)
  • शिवले घराणे : शिवले - देवक वडाचे, वढू बुद्रुक व तुळापूर महाराष्ट्र. संभाजी महाराजांची समाधी
  • सावंत घराणे : सावंत - सावंतवाडी, (कोकण विभाग महाराष्ट्र आणि गोवा राज्य)
  • गायकवाड घराणे : गायकवाड देवगीरीच्या यादवांचा वंश, - सोमवंश, गोत्र गौतम, देवक सुर्यफूल राजगड, सासवड, पुरंदर, भोर, नीरा, नेतवड (शिवनेरी जुन्नर जवळ),चांदखेड, मुंढवा, कोल्हापूर, कटगुण, आरळे, पन्हाळा, कौळाने(महाराष्ट्र) आणि बडोदे (गुजरात).पुणे जिल्हा १) चांदखेड २) मुंढवा ३)कोंढापूरी ४)नेतवड ५)जुन्नर ६) औंध ७) कोलवडी ८) आहीरे ९) डोंगरगाव १०) पिंपरे ११) करंदी १२) वडकी १३) दिघी १४) मसनेरवाडी १५) बहूली १६) कांब्रे १७) जांबे १८) गुळानी १९) हिवरे २०) कडूस २१) म्हाळूंगे २२) पाटस २३) कोंढवा २४) भांडगाव २५) डाळज नं ३. २६) माळेगांंव बु।। सातारा जिल्हा १) विहे २) वाठार किनई ३) निनाम पाडळी ४) आसनगाव ५) भुपाळगड ६)तरडगाव ७) कटगुन ८) अमृतवाडी सोलापूर जिल्हा १) रिधोरे बार्शी २) मोहोळ ३) वडगाव करंमाळा ४) मालेगाव म्हाडा ५) कोंडी ६) शिरसी ७) कडलास ८) निमगाव ९) अक्कलकोट १०) शेळगाव ११) वरवडे माढा १२) औझेवाडी धाराशिव जिल्हा १) इड अंतरगाव २) मोह ३) सांगली जिल्हा १) बलवडी २) रामापूर ३) शेटफळे ४) चिंचाळे ५) विसापूर नाशिक जिल्हा १) कौळाने २) विठ्ठलवाडी ३) चाळीसगाव ४) तळवाडे नागपूर जिल्हा १) रेहाना परभणी १) झारी बारी कोल्हापूर जिल्हा १) आरळे २) सुपात्रे ३) मसुद माले ४) पन्हाळा बीड जिल्हा १) सुकळी
  • गरुड घराणे : गरुड -महाराष्ट्र बेलसर, (मावळ) सांगिसे, टाकवे(खुर्द).
  • शेलार घराणे : शेलार/ शिलाहार अपरांत- यांचे कोल्हापूर व कोकण (महाराष्ट्र).
  • जगताप घराणे : जगताप देवक वडाच, गोत्र अत्री, चंद्रवंशी- सासवड, बारामती (ढाकळे-पांढरे), शिरुर, सातारा, पिं.चिं नखाते, पुणे, महाराष्ट्र. भरतपूर मूळ गादी.
  • जाधव घराणे : जाधव चंद्रवंशी,कुळ-यदुकुळ, देवक पानकणीस, गोत्र अत्री- सिंदखेड राजा, विदर्भ,शिंदे-पळसे नाशिक,वाशिम जिल्हा उंब्रज, सासवड, सातारा जळगावजाधव इनामदार येथील भुईंज,निनाम, बहे,अतीत,परिचे, साताऱ्याच्या उत्तरेस सहा कोसावर असलेले गोवे गाव आर्वीकर जाधव-पाटील इनामदार
  • कड देशमुख घराणे : कड देशमुख-संग्रामदुर्ग. चाकण,सासवड येथील मूळ देशमुख. (चव्हाण कुळ) नायगाव (सिदोबाचे), नानगाव ता. दौंड, सोरतापवाडी. छत्रपती शाहू आणि पेशवे कालीन सरदार घराणे.
  • सरदार थोरात घराणे : थोरात - देवक सुर्यफूल, सूर्यवंशी, गोत्र वशिष्ठ, कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोले, सिन्नर, पारनेर, वाळकी, वीरगाव, पिंपळगाव, खुटबाव, वाळवणे, अष्टा, भूम, ओंड, कार्वे, बहे, वाळवे, येळवी,‌‌ थोरातवाडी कौठा , अनगरें ता श्रीगोंदा. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवेकाळापर्यंतचे सरदार घराणे.
  • तुंवर-पाटील घराणे : [राजेतौर,तुंवर-पाटील ठाकुर] -कुंतलवंशीय पांडवातील अर्जुनाचे व दिल्लीपती आणि ग्वाल्हेरचा तोमर,तंवर यांचे वंशज आणि साडेबावीस गावे गोदावरी नदीच्या काठी जहागिरदार जिल्हा जालना आणि बीड यांच्या सीमेवर आणि कोल्हापूर येथे भोज राजाची राजधानी कसबा बीड येथील पाटीलकी आणि सावकार
  • घोरपडे घराणे : घोरपडे,सिसोदीया वंश, राजे घोरपडे - मुधोळ, (महाराष्ट्र, कर्नाटक).
  • घर्गे-देसाई (देशमुख) घराणे : घर्गे-देसाई (देशमुख) शिरोळ आणि निमसोद - महाभारतातील यशोवर्धन राजाचे वंशज
  • परिहार-(पऱ्हाड) घराणे : परिहार-(पऱ्हाड)]]- साडे बारा गावे (वंश सूर्यवंश) गोदरी, अंचरवाडी, भालगाव, पिंप्री, डिग्रस बु, यवता, माळशेंबा, केंदूर
  • पाटील - मूळचे सरदेसाई-सध्याचे वतनदार पाटील बसरेवाडी - भुदरगड (कोल्हापूर), देशमुख घराणे, [कोल्हापूर][बेळगांव][गडहिंग्लज]
  • फरगडे घराणे : फरगडे कुळ चितौडगड घराणा, यमाजी फरगडे मूळ पुरूष, पेमगिरी किल्ला, वरवंड, संगमनेर
  • कडु घराणे : कडु- देशमुख घराणे- शिराळा जि.अमरावती
  • काळे-देशमुख घराणे : काळे-देशमुख घराणे- १) राशीन, ता.कर्जत, जि.नगर., २)घोडेगाव, ता.आबेगाव,जि.पुणे
  • शिळीमकर देशमुख घराणे : शिळीमकर देशमुख :(मूळ शिंदे)सरदार घराणे,देशमुख गुंजन मावळ(भोर - राजगड परिसर)
  • काटकर घराणे : काटकर घराणे :- वडजल, कुकुडवाड ता. माण
  • पालकर घराणे : पालकर - मूळचे आताच्या विदर्भ मराठवाडा सीमेवरील मोहलाई सातगाव पाल शृंगरपुर या ठिकाणी पुतळाबाईचे माहेर मोहालाई
  • शिरोळे (पाटील) घराणे : शिरोळे (पाटील) घराणे - शिवाजीनगर (भांबुर्डे) पुणे शहर, पानिपत वीर शेखोजी शिरोळे (पाटील).
  • गोळे घराणे : गोळे घराणे, भुजजी गोळे,धाकलोजी गोळे, रुद्रजी गोळे १५३ गावात सरनौबत गोळे