Skip to main content

कसे सहभागी व्हायचे?

प्रत्येक मराठ्याच्या हाताला काम आणि प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आपले दीर्घकालीन ध्येय आहे. "प्रॅक्टिकल मराठा" मधे सहभागी होण्यासाठी अनेक पर्याय आहेत -

  • आपल्या ह्या मध्यवर्ती वेबसाईटवर "रजिस्टर व्हा". तुमचे व्हेरीफिकेशन पूर्ण झाले की तुम्ही कला, क्रीडा, इतिहास आणि तुमच्या आवडीच्या विवीध विषयांवर लिखाण करू शकता. तुमचे विचार, कार्य जगभरातील मराठी लोकांच्या दृष्टीक्षेपात येईल. तुमच्या माहितीमधे आपल्या मराठा समाजातील लोकांना नोकरी किंवा सेवा क्षेत्रात संधी असतील तर त्यादेखील तुम्ही जॉबबोर्डावर मांडू शकता. आपल्यातील जे मराठा सहकारी व्यावसायिक किंवा उद्योजक आहेत ते आपली उत्पादने किंवा सर्विसेस ह्याबद्दल माहिती देऊ शकतात जी डिरेक्टरीमधे उपलब्ध होईल. मराठा समाजातील विवाहेच्छुक वर-वधू प्रोफाइल रजिस्टर करू शकतात. आणि हे सारे कायमच विनामूल्य आहे!

  • मराठा समाज महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा मध्य प्रदेश या ठिकाणी पसरलेला आहे आणि त्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रथा आणि परंपरा आहेत त्याची ओळख आपण ब्लॉगिंग च्या माध्यमातून या ठिकाणी पोस्ट करू शकता.

  • समाजातील मध्ययुगीन काळापासूनची रत्ने ज्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले आणि सध्या करत आहे यांची माहिती संकलित करून पोस्ट करू शकता. आपल्या समाजाच्या काही एनजीओ संघटना आणि संस्था समाजाच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. यासंदर्भात माहिती आपण या ठिकाणी पोस्ट करू शकता. अनिष्ट प्रथा परंपरा यावर आणि समाज प्रबोधन पर लेखन करू शकता. समाजाच्या विकासासाठी आपल्याकडे काही कल्पना आणि योजना असतील तर त्या संदर्भात लिखाण करू शकता आणि पोस्ट करू शकता.

  • तुम्हाला आर्थिक सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही प्रॅक्टीकल मराठा कंपनीचे शेअर्स विकत घ्या आणि प्रत्यक्ष कामात सहभागी व्हा. शिवाय तुम्ही आपल्या उत्पादनांची फ्रँचाईजी घेऊ शकता. "प्रॅक्टीकल मराठा" ही भारतीय कंपनी नियमांतर्गत रजिस्टर्ड कंपनी असून कुठल्याही प्रकारची "Get Rich Quick Scheme" किंवा नेटवर्क मार्केटिंग नाही. आपण कुणालाही लोक जोडण्यासाठी किंवा कशासाठीही कुठल्याच स्वरूपात कमीशन देत नाही. उत्पादनांच्या विक्रीमधून जो व्यवसाय होतो त्यावर ही कंपनी चालते. आपल्या समाजातील शेअरहोल्डरच्या फंडमधून आपल्याला किमान ३ वर्षे वाटचाल करायची आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

  • प्रॅक्टीकल मराठा ह्या आपल्या वेबसाईटची माहिती आणि लिंक शेअर करून अधिकाधिक लोकांना ह्यात सहभागी करू शकता. साईटवर सातत्याने नविन सहकारी रजिस्टर होत असतात. तुम्ही त्यांच्या व्हेरीफिकेशनची जबाबदारी घेऊ शकता. आपले सोशल मीडिया हँडल खाली दिलेले आहेत. ह्यांना व्हिजीट करून फॉलो करू शकता, शेअर करू शकता

  • प्रॅक्टीकल मराठा कंपनी आणि वेबसाईट ह्यावर सातत्याने काहीनाकाही चालू असते. त्यात सहभागी होण्यासाठी तुम्ही आपला व्हाट्सॅप ग्रुप जॉईन करू शकता. प्रॅक्टीकल मराठाच्या व्हाट्सॅप ग्रुप आणि सोशल मीडिया चॅनेल्सवर "Strict No Spam, No Greeting, No Forward Policy" राबवली जाते हे कृपया लक्षात घ्या.